Thursday, January 27, 2011

पहिल्या तिमाहीत काय खावे? काय काळजी घ्यावी?

12 comments
सर्व नवोदित प्रेग्नंट मातांना हाच प्रश्न असतो.. पहिल्या तिमाहीत काय खावे? काय काळजी घ्यावी?

खरं सांगायचे तर, माझ्या डॉक्टरने सांगितले सर्व काही खा. प्रमाणामध्ये खाल्लेले सगळ्याप्रकारचे अन्न चांगलेच! आपण काही आवडले म्हणून ऊस मूळासकट खात बसत नाही. चिकन खावे वाटले तर फक्त चिकनच खात नाही. त्यात पोळी, दुसरी व्हेज भाजी, भात, वरण असतेच. त्यामुळे काहीच हरकत नाही.
मासा खाताना मात्र त्यातले मर्क्युरीचे प्रमाण पाहून घ्यावा. सामन , तिलापिया , श्रिंप , क्रॅब इत्यादी कधीमधी ठिक आहे. बाकीचे हाय मर्क्युरीवाले फिश तर मी कधीच खाल्ले नाहीत. त्यामुळे ती चिंता नव्हती..
कॉफीबद्दल, पपईबद्दल तर मी आधी लिहिलेच आहे.

येथे मी काहीच दिवसांत रेसिपीज देईन. त्यांचा नक्कीच उपयोग होईल..
 

Friday, May 28, 2010

प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर?

17 comments
आपण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह अथवा निगेटीव्ह कशी येते हे पाहीले.
आता तुम्हाला कळले आहे की टेस्ट पॉझिटीव्ह आहे.. मग तुम्ही काय कराल?? :) अर्थातच आनंदाने नाचाल(मनातच!) घरच्या माणसांना, मोठ्यांना ही गुड न्युज द्याल. व सुरू होईल सल्ल्यांची मालिका! :) सवय करून घ्या त्याची. ते सत्र काही लवकर संपणारे नाही.

मी तरी २-३ दिवस पूर्ण ब्लँक झाले होते. जमिनीवर यायला वेळच लागला तसा. आणि अर्थातच थोडीशी भिती/टेन्शन घेऊनच आले जमिनीवर. का? तर घरून भरपूर सुचना. जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका. ३ महिने अज्जिबात कोणाला सांगायचे नाही. अजिबात जास्त तणाव येईल अशी कामं, विचार करायचे नाहीत. इत्यादी इत्यादी..

ह्म्म.. सल्ले अजिबात चुकीचे नाहीत. पण फक्त जस्ट प्रेग्नंट झालेल्या मनाला व शरिराला ते जरा विचित्रच वाटतात. कारण आपण तर अगदी आनंदाने हवेत असतो. मात्र आपण सोडून सगळे तसे मोजुन मापूनच बोलत असतात. असे का?
तर पहिल्या ३ महिन्यात miscarriages होण्याची शक्यता ही अधिक असते. होणार्‍या मातेच्या चुकीच्या आहार-विहाराने ते होऊ शकते. मात्र तेव्हढंच कारण नाही. या ३ महिन्यात होणार्‍या मिसकॅरेजेसचे कारण गर्भाशयाची कमकुवतता, बीजांडाचे व स्पर्म्सचे पूर्णतः निरोगी नसणे -थोडक्यात गर्भ weak असणे इत्यादी गोष्टींने होऊ शकते. ही गोष्ट तशी कॉमनच म्हणायची. म्हणूनच आपल्याकडे पहिले ३ महिने कोणालाही बातमी सांगत नाहीत. त्यात नजर लागणे वगैरे भाग नसतो, तर शास्त्रीय कारण आहे. व डॉक्टर्स लोकं सुद्धा ३ महिने पूर्णपणे पार पडल्यावरच प्रेग्नन्सी कन्फर्म करतात.

त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये होणार्‍या मातेने स्वतःची काळजी घेणं हे तर ओघाने आलेच. पण त्याचबरोबर या ३ महिन्यांचा इतकाही बाऊ करून दडपण घेण्याची जरूरी अजिबात नाही.
जसं नॉर्मल रेग्युलर आयुष्य, रूटीन असेल ते चालू ठेवावे. काही जड गोष्टी उचलू नयेत. बाकी नेहेमीचे घरकाम, नोकरी असेल तर ती, चालणे इत्यादी व्यायाम अशा गोष्टी करायला काहीच हरकत नाही. खाणे सुद्धा सर्व प्रकारचे चालू ठेवावे. माझ्या तर डॉक्टरने मला सांगितले होते, कुठलीही गोष्ट बॅन केलेली नाहीये. माफक प्रमाणात सर्व गोष्टी चालतात. फक्त पपई खाऊ नये कारण पपई खाल्ल्यास गर्भाशय आकुंचन पावू शकते ज्याने गर्भपात होण्याची शक्यता वाढते. मांसाहार करणार्‍यांनी मीट हे व्यवस्थित शिजवलेले आहे ना हे पाहावे. व काही प्रकारचे मासे / रॉ फिश खाऊ नयेत कारण त्यात मर्क्युरीचे प्रमाण जास्त असते. कॉफी दिवसातून जास्तीत जास्त एक कप घ्यावी. त्यापेक्षा जास्त कॅफेनचे प्रमाण पोटात जाणे गर्भाच्या दृष्टीने वाईट. त्यामुळे कॉफी बरोबरच सॉफ्ट ड्रिंक्स, चहा, कोको, चॉकलेट्स या गोष्टी मर्यादित घ्याव्यात.
इत्यादी काही पथ्य सोडली तर नेहेमीसारखा चौरस आहार - भात्,पोळी, पालेभाजी,फळभाजी, कोशिंबीर - असा आहार ठेवावा. जेवण अर्थातच हे सगळे घ्यावे. पण जर जात नसेल तर २ तासांनी उरलेले जेवून घ्यावे. एकंदरीत अनुभव असा आहे की गर्भारपणात भूक तर लागते खूप, मात्र एका वेळेस भरपूर जेवण झाल्यास पोट गच्च होण्याची, गॅसेस होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर २ तासांनी खावे. दुध २ ते ३ ग्लास पोटात गेलेच पाहीजे. तसेच फळे देखील नेमाने खावीत. (यावर माझा नवरा नक्कीच हसेल! कारण फळे खाण्याच्या बाबतीत माझी फार ओरड. पण तुम्ही तसे करू नका. )

सर्वात महत्वाचे ते म्हणजे या काळात किंवा पूर्ण गर्भारपणातच, मन हे अगदी प्रसन्न राहीले पाहीजे. हं, थोडीफार चिडचिड, हळवेपणा, रडारड, एकटेपणाची भावना हे सगळं सगळं जाणवेल. हार्मोन्सचा दोष ! पण ते नॉर्मल आहे. मी कित्येकदा बळंच रडली आहे ढसाढसा. व ते रडत असताना सुद्धा नवर्‍याला हसत सांगितले आहे की हे मनावर घेऊ नकोस, मला माहीतीय मी उगीच रडतीय. रडावेसे वाटले घ्या रडून. मात्र हे सगळे कन्ट्रोल देखील करता आले पाहीजे. शेवटी आपल्या बाळाच्या तब्येतीसाठी ते महत्वाचे आहे! त्यामुळे मातांनो, खुष रहा, मस्तपैकी खा मात्र सुस्त न होता व्यायामही करा ! Your time has begun!

Wednesday, March 31, 2010

गर्भधारणा कशी होते व गर्भधारणेचे काही Symptoms !

147 comments
मागच्या भागात आपण जीवधारणा(conception) कशी होते हे पाहीले. ज्या वेळेस conception होते, त्याच वेळेस बाळ ( किंवा embryo) हे २ आठवड्याचे असल्याचे मानले जाते. अर्थातच तेव्हा शरीरात लगेचच दिसतील असे काहीच बदल होत नसल्याने हे सगळं नाट्य घडतंय हेच समजत नाही.
Conception नंतर २ आठवडे हा काळ सर्वात लांबणारा, वाट पाहण्याचा काळ! तुम्ही प्लॅनिंग करून बाळाची वाट पाहात असाल , तर हे २ आठवडे मानसिकदृष्ट्या फारच दमवणारे आहेत. २च आठवडे का? तर हल्ली सर्व दुकानांतून घरच्या घरी करण्याजोग्या युरिन टेस्ट्स( Urine Tests ) मिळतात. त्या तपासण्या करण्यासाठी तुम्हाला किमान २ आठवडे थांबावे लागते. अर्थातच Ovulation नंतर २ आठवडे व काही दिवसात पुढची मासिक पाळी येणार असते. ती जर आली नाही वेळेवर तर कळतेच! पण हल्लीच्या युरिन टेस्ट्समुळे पाळी यायच्या अगोदर ३ ते ४ दिवस समजु शकते की गर्भधारणा झाली आहे की नाही.

गर्भधारणा होते म्हणजे नक्की काय?


मागच्या भागात पाहील्याप्रमाणे जेव्हा स्पर्म्स (sperms) व बीजांड यांचे मिलन होते तेव्हा गर्भधारणा होते. पण त्यानंतर नक्की काय होते हे पाहूया.

मूळात स्पर्म्स व बीजांड यांच्यातील जैविक गोष्टी(genetic material) एकत्र होतात. म्हणजेच क्रोमोझोम्सच्या जोड्या जुळतात. जर स्पर्ममध्ये Y क्रोमोझोम असेल तर मुलगा होतो, व X क्रोमोझोम असेल तर मुलगी होते.

Actual गर्भधारणा झाल्यावर बीजांडाचा ३ ते ४ दिवसांचा प्रवास सुरू होतो, फॅलोपिअन ट्युबपासून गर्भाशयापर्यंत. तेथे आल्यावर फलित बीजांडाचे १६ समान पेशींमध्ये विभाजन होऊन त्या सर्व पेशी गर्भाशयाच्या आवरणाला चिकटतात. यावेळेस गर्भाला Blastocyst असे म्हटले जाते.
चित्रात दिसत असलेल्या inner cell mass चे गर्भात रूपांतर होते. Blastocyst cavity लिहीलेल्या भागाची Amniotic Sac निर्माण होते.(हे काय? ते नंतर पाहू.) Trophoblast लिहीलेल्या पेशींची placenta (वार) तयार होते, जी बाळाला ऑक्सिजन,पोषणमुल्ये पुरवण्यास व गर्भाला नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्यास मदत करते.
या सर्व पेशी निर्माण झाल्यास गर्भधारणा झाली असे मानता येते.

आपण वर वाचलेत की, हल्ली घरीच युरिन टेस्ट करून गर्भधारणा झाली आहे की नाही हे कळते.


Home Pregnancy Tests काय करतात?

जेव्हा गर्भधारणा होते, तेव्हा शरीरात बरेच बदल घडून येत असतात. मगाशी वाचल्याप्रमाणे वेगवेगळ्या पेशींचा समुह होऊन गर्भाची धारणा गर्भाशयात होते. जेव्हा Placenta निर्माण होते, तेव्हा शरीर एक हार्मोन तयार करते. ते असते - hCG. ( Human Chorionic Gonadotropin ) हे हार्मोन्स तयार झाल्यावर त्या स्त्रीच्या ओव्हरीजना (ovaries) संदेश मिळतो की इथून पुढे बीजांडे release करू नका. तसेच याच hCG मुळे शरीरात estrogen व progesterone ची वाढ झपाट्याने होऊ लागते. व त्यामुळेच गर्भाशयातील अस्तर निघून येण्यापासून बचावते. (म्हणजेच मासिक पाळी येणे थांबते.)
हे सर्व होत असतानाच दर दिवसाला hCG हार्मोन्सची संख्या जवळजवळ दुप्पट होत असते. आणि म्हणूनच conception झाल्यानंतर साधारण २ आठवड्यांनी home pregnancy test वर त्या हार्मोन्सची उपस्थिती दिसून येते. म्हणजेच home pregnancy test चा निकाल पॉझिटीव्ह येऊन गर्भधारणा झाल्याचे तुम्हाला समजते !
(जरी आजकालच्या टेस्ट्स अती-सेन्सेटीव्ह करून पाळीच्याही आधी निकाल समजत असला, तरी पाळी चुकेपर्यंत थांबणे हे केव्हाही उचित. या टेस्टवर False negative निकाल दिसू शकतो , पण false positive कधीच दिसत नाही. म्हणजेच, प्रेग्नंट असताना देखील टेस्ट नसल्याचे सांगू शकेल परंतू प्रेग्नंट नसताना , प्रेग्नंट आहे असा निकाल कधीच येणार नाही!)

मघा आलेल्या amniotic sac चा संदर्भ हा, की प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटीव्ह येई पर्यंतच्या काळात, किंवा 2 weeks wait च्या काळात गर्भाशयात amniotic fluid वाढत जाते, व त्याचीच amniotic sac होते. हीच पिशवी व त्यातील ऍम्निऑटीक फ्लुईड, पुढील ९ महिने बाळाभोवती कुशन प्रमाणे राहते.

या सर्व काळात तुम्हाला जाणवतील अशी काही सिम्प्टम्स असतात का? तर हो असतात! मी मला जाणवलेली symptoms तसेच इतर ठिकाणी वाचनात आलेले symptoms येथे लिहीते.


Pregnancy Symptoms


 • जेव्हा बीजांडाचे १६ तुकड्यात विभाजन होऊन ते सर्व गर्भाशयाला चिकटतात (यालाच Implantation) म्हणतात. त्या सुमारास थोड्या प्रमाणात brown spotting होऊ शकते. तसेच त्याच सुमारास ओटीपोटात अगदी lower stomach मध्ये कळा जाणवू शकतात. (या कळा मला जाणवल्या होत्या. मी तरी अशा कळा कधीच अनुभवल्या नसल्याने व मी एक्स्ट्रा अटेन्टीव्ह राहील्याने मला बर्‍याच खाणाखुणा समजल्या.) 
 • अतिशय थकवा. मी त्या दोन आठवड्याच्या काळात सकाळी कधीच उत्साहाने बेडमधून उठू शकले नाही. काही कामं आहेत म्हणून बळंबळं उठायचे. सतत अंथरूणावरच पडून राहावे इतका थकवा आला. पायही प्रचंड दुखले. 
 • Painful, Tender , Swollen Breasts. ब्रेस्ट्समधला फरक देखील जाणवण्याइतपत असतो. झोपेतल्या झोपेत बदलेल्या कुशीने देखील ब्रेस्ट दुखतात. 
 • सतत लघवीला जाणे. हे देखील जाणवणारे सिम्प्टम. एरवी असे होत नाही. तुम्ही जास्त पाणी प्या, नका पिऊ लघवीचे प्रमाण वाढतेच. 
 • मला जवळपास अगदी दुसर्‍या दिवशीपासून लांबवरचे देखील वास येऊ लागले होते. Pregnancy heightens the power and sense of smell. या वास येण्याच्या मजा व सजा देखील तर कैक आहेत. अजुनही तेव्हढाच वास येतो. मला आत्ता हॉलमध्ये बसून स्वयपाकघरातील टेबलावर ठेवलेल्या पिकलेल्या पेरूंचा वास त्रास देतोय. 
 • शरीर तापल्यासारखे वाटणे. हेसुद्धा जाणवण्याइतपत होते. दिवसा पोटाच्या आसपासचा भाग गरम राहतो तर रात्री पाऊले गरम लाव्हा रसासारखी तापतात. कधीही न उकडणार्‍या मला प्रचंड उकडू लागले होते. 
 • Bloating : मला माझ्या पोटाचा भाग Bloat झाल्यासारखा, सुटल्यासारखा वाटत होता. अर्थात परत, हे सर्वांनाच वाटेल असे काही नाही. 
 • एके दिवशी अचानकच माझ्या दाता-हिरड्यांतून रक्त येऊ लागले होते. दात घासताना तर अजुनही रक्त येते. मूळात हिरड्या नाजुक असल्याने होत असेलच. पण नेटवर वाचल्यावर कळले, की (estrogen, progesterone etc) हार्मोन्स वाढल्याने शरीरातील रक्तपुरवठा खूप वाढतो व तोंडातून रक्त येऊ शकते. 
मला फारशा न जाणवलेल्या परंतू कॉमन असलेल्या काही प्रेग्नन्सीच्या खुणा देखील आहेत.  उदा: 
  • मळमळ, नॉशिया. 
  • चक्कर येणे. (मला मोजुन १दाच चक्कर आली. प्रत्येकाची बॉडी वेगळी त्याचमुळे प्रत्येकाच्या खाणाखुणा वेगळ्या.) 
  • Food Aversions : एखाद्या पदार्थाबद्दल नकोसे वाटणे. यात आवडणार्‍या पदार्थांविषयी सुद्धा नकोसे वाटून मळमळू शकते. मला फार काही त्रास झाला नाही, तरी चॉकलेट, व तत्सम पदार्थ खाणे कमी झाले. तर कांदे, तिखट खाणे बर्‍यापैकी वाढले.) 
  तर अशी होते गर्भधारणा व असे असतात काही symptoms ! तुम्ही जर थोडेसे अलर्ट राहीलात तर तुम्हाला स्वत:लाच कळते की तुम्ही प्रेग्नंट आहात. मला कळले तसे ! माझ्या नवर्‍याने मला फार समजवले की असं करू नकोस, इतकी इन्व्हॉल्व्ह झालीस व प्रेग्नंट नाहीये कळलं तर त्रास होईल तुला. अर्थातच तसे झाले नाही. पण हो, इन्व्हॉल्व्ह होऊ नये हे मात्र खरेच. कारण दर महिन्याला तो २ आठवड्याचा काळ वाट पाहात, आशेमध्ये घालवायचा व यश न मिळाल्यास परत तीच सायकल, हे सगळे फार थकवणारे आहे. मला पहिल्याच २ आठवड्यांनी वात आणला. वर्षानुवर्षे प्रयत्न करणार्‍यांचे तर खरंच वाईट वाटले मला. म्हणून involve न होणेच चांगले. 

  पुढच्या भागात पाहूया : प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर... ?

  Friday, March 12, 2010

  स्त्रीपुरूषांची शरीररचना - Reproductive System.

  7 comments

  (एक डिस्क्लेमर: हा ब्लॉग ’प्रेग्नन्सी’ या विषयाभोवती फिरत असल्याने, बरेच एरवी-वापरायला-व-मराठीत-वाचायला-अजुनच-लाज-वाटेल असे शब्द इथून पुढे येतील. तसेच बरेच इंग्रजीसुद्धा शब्द असू शकतील. कारण मी सायन्स इंग्लिशमधूनच शिकले. व त्याचे मराठीकरण करत बसायला वेळ नाही. त्यामुळे त्या शब्दांबद्दल मी काहीच करू शकत नाही.) 

  तर,तुम्ही आईबाबा होण्यासाठी तयार आहात ?

  हो, प्रत्येकाने हा प्रश्न नक्कीच स्वत:ला पाडून घेतला पाहीजे! बाळासाठी तयार होणे हे सोपे काम नाही. किंवा घरातील मोठी माणसे मागे लागतात म्हणून ’उरकायची’ गोष्ट नाही. तुम्हाला जर तुमचे व तुमच्या बाळाचे आयुष्य उत्तमरित्या व्यतित करायचे असेल, तर ही तयारी केलेली असलीच पाहीजे. 
  या तयारीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील ? पाहूया आपण.  
  •  मानसिक तयारी : ही तयारी सर्वात जास्त महत्वाची. कारण मानसिकदृष्ट्या जर तुम्ही तयार नसाल तर माझ्यामते तरी ती चांगली गोष्ट नाही. बाळ होण्याचा निर्णय हा कायमच मानसिकदृष्ट्या प्रिपेअर्ड असताना घेतलेला चांगला. नंतरच्या प्रवासातले छोटे-मोठे अडथळे, शारिरीक त्रास सहन करण्याचे बळ मिळेल त्याने. 
  • शारिरीक तयारी : ही देखील तितकीच महत्वाची. प्रत्येक जोडीने मनाइतकीच शरिराची तयारी केली पाहीजे. स्त्रिया व्यवस्थित आहार घेतात ना ? हे पाहणे जितके जरूरी तितकेच पुरूष समतोल आहार घेतात ना पाहणे जरूरी आहे. धुम्रपान,मद्यपान या गोष्टी पूर्णपणे सोडूनच बाळाचा विचार करावा. जी व्यक्ती धुम्रपान,मद्यपान करते ती खरे म्हणजे आई-बाप होण्यास लायकच नव्हे. स्त्री-पुरूष दोघांनीही डॉक्टरांकडून तपासणी करून घेतलेली तर फारच उत्तम ! त्यायोगे ऍनिमिक असणे, स्पर्म काउंट कमी असणे, किंवा पाळीशी संबंधित प्रॉब्लेम्स आधी दूर करणे व तशा उपाय-योजना, औषधे घेणे हे अतीउत्तम. जितके मनाचे व शरीराचे स्वास्थ्य चांगले तितकी अपत्यधारणा व प्रसुती सुलभ होऊ शकेल. 
  • आर्थिकदृष्ट्या तयारी : खर्चांमध्ये फार ड्रास्टीक फरक पडत नसला, तरी प्रत्येकाने आपली तिजोरी आधीच तपासून ठेवलेली केव्हाही चांगली. परदेशात असाल तर व्यवस्थित इन्शुअरन्स असणे जरूरी आहे. तसेच परदेशात हे सर्व खर्च भयानक खर्चिक असतात त्यामुळे ही तयारी महत्वाची आहेच. 
  ही सर्व तयारी झाली? Very good ! आता तुम्ही नक्कीच बाळाचा विचार करू शकता.  
  बरेचदा कपल्स अज्ञानामुळे, सखोल माहिती नसल्यामुळे किंवा ती करून घ्यायची इच्छा नसल्याने अपत्यनिर्मिती म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्स समजतात. खूपदा त्याकारणामुळे अपत्यनिर्मिती होतही असेल. पण conception( जीवनिर्मिती ) होण्यामागे जे शास्त्र आहे ते माहित करून घेणे गरजेचे आहे. 

  स्त्रियांची शारीरिक (Reproductive System) जडणघडण 

  स्त्रिया या जन्मत:च आयुष्यभराचा Eggsचा साठा ओव्हरीजमध्ये घेऊन जन्माला येतात. (आपण त्याला Pre-eggs म्हणू.) त्यामुळे स्त्रियांचे बीजांड हे तिच्या वयाइतकेच प्रौढ असते असं म्हणता येईल !
  जन्मत:च साधारणपणे १,०००,००० ते २,०००,००० बीजंडे स्त्रीच्या शरीरात असतात. जवळपास  झोपलेल्या स्थितीत. आणि प्युबर्टीच्या हार्मोन्सच्या Wake-up Callची वाट पाहात असतात. 
  अर्थात puberty येई पर्यंत साधारण ३००,००० ते ५००,००० च बीजंडे जिवंत राहतात. हे राहीलेले premature-eggs(oocytes) चक्क शरीरात पसरले जातात. व त्या प्रत्येक oocytesमध्ये असतात २३ क्रोमोझोमच्या जोड्या. म्हणजे टोटल क्रोमोझोम्स ४६. परंतू प्रीमॅच्युअर्ड एग्सचे जेव्हा ऍक्चुअल एग मध्ये रुपांतर होते, तेव्हा मात्र या पेशींचे विभाजन होऊन विनाजोडीचे केवळ २३ क्रोमोझोम्स राहतात. [ व उरलेले २३ अर्थातच स्पर्म्समधून मिळून परत २३ क्रोमोझोम्सची जोडी तयार होते.थोडक्यात गर्भ तयार होतो. ]

  जेव्हा प्युबर्टीचा काळ येतो, तेव्हा या सर्व प्रीमॅचुअर्ड एग्समधून एकच एग मॅचुअर्ड होते, व ते ओव्हरीजमधून सोडले जाते (हेच ते ओव्ह्युलेशन). या ओव्ह्युलेशनच्या काळात एगचा स्पर्म्सशी संबंध आल्यास conception होते , अथवा न आल्यास मासिक पाळी येते. 

  [ या क्रोमोझोम्सवरून आठवले. स्त्रीचे वय जसे वाढू लागते तसेतसे हे पेशी विभागणी तंत्र कदाचित बिघडू शकते. त्यामुळे कधीकधी २३ च्या जागी २४ क्रोमोझोम्स असणे इत्यादी परिस्थिती निर्माण होऊन डाऊन सिंड्रोम असलेली अपत्ये जन्मास येऊ शकतात. त्यामुळे स्त्रीचे वय हे गर्भधारणेत महत्वाचे मानले जाते. 
  तसेच स्त्रीचे वय व तिचे रूप हे कधीकधी विषमप्रमाणात असू शकते. म्हणजे ४०ची बाई ३०ची दिसते इत्यादी. याचप्रमाणे एग्ससुद्धा विषमप्रमाणात फर्टाईल असू शकतात. म्हणजे ३०च्या बाईचे बीजांडं हे कमी फर्टाईल किंवा ४०च्या बाईचे बीजांड हे अधिक फर्टाईल असू शकते. आता आधुनिक विज्ञानामुळे या तपासण्या करून घेता येतात, ज्यावरून शरीरात किती फर्टाईल एग्स शिल्लक आहे हे कळते.  ]

  क्रमश:

  माझी ओळख व माझे प्रेग्नंसीसाठीचे वाचनाचे सोर्सेस

  25 comments
  हाय !!

  तुम्ही हा ब्लॉग वाचताय म्हणजे नक्कीच तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा वाट पाहात आहात! तेव्हा अभिनंदन!! (किंवा शुभेच्छा!)
  मी हा ब्लॉग सुरू करण्याची बरीच कारणे आहेत.
  सर्वात महत्वाचे म्हणजे मला जेव्हा गरज होती तेव्हा प्रेग्नंसीबद्दल मराठीमधून फारशी माहीती मला मिळाली नाही. तेव्हाच डोक्यात किडा आला की हे मला करता येईल. तसेच प्रेग्नंसीसारखेच ब्लॉगिंग मध्ये सुद्धा बेबी स्टेप्स टाकून पाहता येतील !
  आजकालच्या , माझ्या वयाच्या मुली या नक्कीच शांत बसणार्‍य़ा नाहीत.
  जेव्हा आयुष्यातील इतकी मोठी स्टेप उचलायची वेळ येते तेव्हा नक्कीच इन्फर्मेशनच्या या जंजाळात जितकी माहिती मिळेल तितकी त्या(माझ्यासारखीच) गोळा करत असतील.

  बायदवे हे! मी अनु. माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी. नवरा मनू. (मस्त जुळतं ना यमक ?) :D
  तर, अनु आणि मनूने ठरवलं होतं की २-३ वर्षं तरी काही बाळाचा विचार करायचा नाही. मोठ्या लोकांनीही साथ दिली व आमचे दोघांचे जॉब्स , करीअर,संसार इत्यादी व्यवस्थित सुरू राहीले. ३ वर्षांनंतर मात्र हा निर्णय जास्त लांबवता येणार नाही हे लक्षात घेऊन मी नोकरी दिली सोडून. व जेव्हढं मिळेल तेव्हढे प्रेग्नन्सीवर वाचू लागले. हो ! साधा हा ब्लॉग काढताना किती रिसर्च केला मी. बाळासाठी ऑब्वियसली केलाच पाहीजे.
  माझे सोर्सेस होते मुख्यत्वेकरून :
  • गर्भसंस्कार - बालाजी तांबे. ( आईचा आग्रह, अजुन काय!)
  • वंशवेल - मालती कारवारकर.
  • इंटरनेटवरील खजिन्यातील काही कण.
  त्यातील गर्भसंस्कार तर अतिशय उत्तम व तितकेच बोजड आहे. फारच संस्कृत आहे त्यात. ते नसेल तर संस्कृतप्रचुर मराठी आहे. त्यामुळे नको वाटते ते. वंशवेलमध्ये आहार कसा असावा या विषयावर बरीच माहीती आहे. मला फार उपयोगी पडले ते आहार ठरवायला. (अजुनही पडते). बाकी इंटरनेटवर तर खजिना आहेच. काही पुस्तकही उत्तम आहेत, ती मी नंतर आणली लायब्ररीतून.

  असो. तर हे माझे सोर्सेस होते. मला बरीच माहीती मिळाली. त्याचा उपयोग सर्वांनाच व्हावा असे वाटल्यामुळे हा ब्लॉग काढला. इथून पुढे रोज मी अपडेट करत जाईन. सद्ध्या तरी मी फ्लॅशबॅक मोडमध्ये आहे. कारण मी जरी 7 weeks प्रेग्नंट असले तरी ब्लॉगमध्ये मला अगदी सुरवातीपासून सुरवात करायची आहे. लवकरात लवकर ते अपडेट करू शकले तर ऍक्चुअल लाईव्ह फ़िड्स देता येतील ! :-)

  चलो टाटा, आवजो , ब्बाय, स्याओ,
  पुन्हा भेटत राहूच.
  अनु.