Friday, March 12, 2010

माझी ओळख व माझे प्रेग्नंसीसाठीचे वाचनाचे सोर्सेस

हाय !!

तुम्ही हा ब्लॉग वाचताय म्हणजे नक्कीच तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा वाट पाहात आहात! तेव्हा अभिनंदन!! (किंवा शुभेच्छा!)
मी हा ब्लॉग सुरू करण्याची बरीच कारणे आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे मला जेव्हा गरज होती तेव्हा प्रेग्नंसीबद्दल मराठीमधून फारशी माहीती मला मिळाली नाही. तेव्हाच डोक्यात किडा आला की हे मला करता येईल. तसेच प्रेग्नंसीसारखेच ब्लॉगिंग मध्ये सुद्धा बेबी स्टेप्स टाकून पाहता येतील !
आजकालच्या , माझ्या वयाच्या मुली या नक्कीच शांत बसणार्‍य़ा नाहीत.
जेव्हा आयुष्यातील इतकी मोठी स्टेप उचलायची वेळ येते तेव्हा नक्कीच इन्फर्मेशनच्या या जंजाळात जितकी माहिती मिळेल तितकी त्या(माझ्यासारखीच) गोळा करत असतील.

बायदवे हे! मी अनु. माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी. नवरा मनू. (मस्त जुळतं ना यमक ?) :D
तर, अनु आणि मनूने ठरवलं होतं की २-३ वर्षं तरी काही बाळाचा विचार करायचा नाही. मोठ्या लोकांनीही साथ दिली व आमचे दोघांचे जॉब्स , करीअर,संसार इत्यादी व्यवस्थित सुरू राहीले. ३ वर्षांनंतर मात्र हा निर्णय जास्त लांबवता येणार नाही हे लक्षात घेऊन मी नोकरी दिली सोडून. व जेव्हढं मिळेल तेव्हढे प्रेग्नन्सीवर वाचू लागले. हो ! साधा हा ब्लॉग काढताना किती रिसर्च केला मी. बाळासाठी ऑब्वियसली केलाच पाहीजे.
माझे सोर्सेस होते मुख्यत्वेकरून :
 • गर्भसंस्कार - बालाजी तांबे. ( आईचा आग्रह, अजुन काय!)
 • वंशवेल - मालती कारवारकर.
 • इंटरनेटवरील खजिन्यातील काही कण.
त्यातील गर्भसंस्कार तर अतिशय उत्तम व तितकेच बोजड आहे. फारच संस्कृत आहे त्यात. ते नसेल तर संस्कृतप्रचुर मराठी आहे. त्यामुळे नको वाटते ते. वंशवेलमध्ये आहार कसा असावा या विषयावर बरीच माहीती आहे. मला फार उपयोगी पडले ते आहार ठरवायला. (अजुनही पडते). बाकी इंटरनेटवर तर खजिना आहेच. काही पुस्तकही उत्तम आहेत, ती मी नंतर आणली लायब्ररीतून.

असो. तर हे माझे सोर्सेस होते. मला बरीच माहीती मिळाली. त्याचा उपयोग सर्वांनाच व्हावा असे वाटल्यामुळे हा ब्लॉग काढला. इथून पुढे रोज मी अपडेट करत जाईन. सद्ध्या तरी मी फ्लॅशबॅक मोडमध्ये आहे. कारण मी जरी 7 weeks प्रेग्नंट असले तरी ब्लॉगमध्ये मला अगदी सुरवातीपासून सुरवात करायची आहे. लवकरात लवकर ते अपडेट करू शकले तर ऍक्चुअल लाईव्ह फ़िड्स देता येतील ! :-)

चलो टाटा, आवजो , ब्बाय, स्याओ,
पुन्हा भेटत राहूच.
अनु.

25 comments:

 1. अगदी बरोबर लिहिले आहे तुम्ही. मी पण खूप अभ्यास केला होता, माझ्या प्रेग्नंसी मध्ये. आता माझे बाळ दिड वर्षाचे आहे आणि मी त्याचा ब्लॉग सुरु केला आहे.
  तुम्ही www.babycenter.in/ या साइटला रजिस्टर करा, सुंदर माहिती आहे तिथे.
  सोनाली केळकर

  ReplyDelete
 2. khup chan mahiti dili aahe, me next mahinyat chance ghenar aahe, mi sudha net var barichashi mahiti search keli, pan me marathi chya shodhat hote ani aaj mala tumcha blog disla, khup changli ani vyavsthit mahiti dili aahe, mazyasarkhya navkhya mulina upyogi padel ashi mahiti aahe.

  ReplyDelete
 3. धन्यवाद सोनाली, बेबीसेंटर वेबसाईट सुंदरच आहे. मी ही ती वाचते.
  सोनल, तुम्हाला ही माहीती उपयुक्त वाटली पाहून आनंद झाला. वाचत राहा.

  ReplyDelete
 4. तुम्ही हा ब्लॉग वाचताय म्हणजे नक्कीच तुम्ही प्रेग्नंट आहात
  हा हा ! या जन्मात तरी ते शक्य नाही ! पण उपयुक्त आहे ब्लॉग. पुलेशु

  ReplyDelete
 5. धन्यवाद साधक.
  पुरूषांसाठी नाहीच हो ती कमेंट! :)

  ReplyDelete
 6. If you are still pregnant I mean I am sorry but I am reading this in a bit hurry...you should refer to "What to expect when you are expecting"..hya madhe month by month details aahet this had helped me a lot...They do have a site whattoexpect.com

  ReplyDelete
 7. Hi Aparna,
  I do have that book. Thanks for your comment.

  ReplyDelete
 8. Hey thanks a lot for information.. but what about next post........ I am eagerly waiting for next post

  Namrata

  ReplyDelete
 9. Thanks Namrata for your comment.
  Have you read next 3 articles I wrote? I'll write more regularly. keep reading!

  ReplyDelete
 10. Thanks for ur reply.... mee regularly tumacha blog vachat ahe. Maza sadhya 8th week chalu ahe.. ani tumachi mahiti khup upyogii padat ahe.. manapasun danyavad.

  Namrata

  ReplyDelete
 11. thanks Dear very much. he sarva mahit mala sudha havi hote te ya side chy madhyamatun milali. me sudha 3 month pregrant ahe. ani mala ya sagalya goshti khupch upyogi padnar ahet.

  Thanks once again dear.

  ReplyDelete
 12. Mazya lagnala 2varsh zale ekda misscarriage pan zale tevapasun pregnency nahi mlagn may 2012 misscrg Dec2012 tofay 16 Nov 2014 wht do i do plzrpl

  ReplyDelete
 13. maza lagnala 9 varsh purn zali pan ajun ekdahi pregency nahi rahili ahe ani mazi 30 date hoti pan atta mazi ajun date nahi ali ahe tar mi nakki kay samjave ki pregency ahe ki nahi

  ReplyDelete
 14. Having read this I thought it was rather enlightening. I appreciate you
  finding the time and effort to put this informative
  article together. I once again find myself spending way too much time both reading and leaving comments.

  ReplyDelete
 15. good job sir.
  i'm really impress to you sir by read this content. i hope you;ll be publish another on .

  ReplyDelete
 16. Hey what a nice content!!!!!
  i really love it. keep it up. i promise that i'll viste your site againe.
  thank for nice contenat

  ReplyDelete
 17. Mala periods date 21july hoti. Ani ajun Mala periods nahi aaale. Ani MI pregasure ne check kel tar te negative dakhvtay MI Kay Karu Mala suggest kara na. Plz

  ReplyDelete
 18. Mala periods date 21july hoti. Ani ajun Mala periods nahi aaale. Ani MI pregasure ne check kel tar te negative dakhvtay MI Kay Karu Mala suggest kara na. Plz

  ReplyDelete
 19. Mala periods date 21july hoti. Ani ajun Mala periods nahi aaale. Ani MI pregasure ne check kel tar te negative dakhvtay MI Kay Karu Mala suggest kara na. Plz

  ReplyDelete
 20. Mala periods date 21july hoti. Ani ajun Mala periods nahi aaale. Ani MI pregasure ne check kel tar te negative dakhvtay MI Kay Karu Mala suggest kara na. Plz

  ReplyDelete
 21. जुळी मुलं न होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?

  ReplyDelete
 22. एकदा गर्भधारणा झाल्यावर किती दिवसानी दुसरी गर्भधारणा होते (१ महीन्यात, २ महिन्यात का अजुन किती महिन्यात )

  ReplyDelete