Friday, March 12, 2010

स्त्रीपुरूषांची शरीररचना - Reproductive System.


(एक डिस्क्लेमर: हा ब्लॉग ’प्रेग्नन्सी’ या विषयाभोवती फिरत असल्याने, बरेच एरवी-वापरायला-व-मराठीत-वाचायला-अजुनच-लाज-वाटेल असे शब्द इथून पुढे येतील. तसेच बरेच इंग्रजीसुद्धा शब्द असू शकतील. कारण मी सायन्स इंग्लिशमधूनच शिकले. व त्याचे मराठीकरण करत बसायला वेळ नाही. त्यामुळे त्या शब्दांबद्दल मी काहीच करू शकत नाही.) 

तर,तुम्ही आईबाबा होण्यासाठी तयार आहात ?

हो, प्रत्येकाने हा प्रश्न नक्कीच स्वत:ला पाडून घेतला पाहीजे! बाळासाठी तयार होणे हे सोपे काम नाही. किंवा घरातील मोठी माणसे मागे लागतात म्हणून ’उरकायची’ गोष्ट नाही. तुम्हाला जर तुमचे व तुमच्या बाळाचे आयुष्य उत्तमरित्या व्यतित करायचे असेल, तर ही तयारी केलेली असलीच पाहीजे. 
या तयारीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील ? पाहूया आपण.  
 •  मानसिक तयारी : ही तयारी सर्वात जास्त महत्वाची. कारण मानसिकदृष्ट्या जर तुम्ही तयार नसाल तर माझ्यामते तरी ती चांगली गोष्ट नाही. बाळ होण्याचा निर्णय हा कायमच मानसिकदृष्ट्या प्रिपेअर्ड असताना घेतलेला चांगला. नंतरच्या प्रवासातले छोटे-मोठे अडथळे, शारिरीक त्रास सहन करण्याचे बळ मिळेल त्याने. 
 • शारिरीक तयारी : ही देखील तितकीच महत्वाची. प्रत्येक जोडीने मनाइतकीच शरिराची तयारी केली पाहीजे. स्त्रिया व्यवस्थित आहार घेतात ना ? हे पाहणे जितके जरूरी तितकेच पुरूष समतोल आहार घेतात ना पाहणे जरूरी आहे. धुम्रपान,मद्यपान या गोष्टी पूर्णपणे सोडूनच बाळाचा विचार करावा. जी व्यक्ती धुम्रपान,मद्यपान करते ती खरे म्हणजे आई-बाप होण्यास लायकच नव्हे. स्त्री-पुरूष दोघांनीही डॉक्टरांकडून तपासणी करून घेतलेली तर फारच उत्तम ! त्यायोगे ऍनिमिक असणे, स्पर्म काउंट कमी असणे, किंवा पाळीशी संबंधित प्रॉब्लेम्स आधी दूर करणे व तशा उपाय-योजना, औषधे घेणे हे अतीउत्तम. जितके मनाचे व शरीराचे स्वास्थ्य चांगले तितकी अपत्यधारणा व प्रसुती सुलभ होऊ शकेल. 
 • आर्थिकदृष्ट्या तयारी : खर्चांमध्ये फार ड्रास्टीक फरक पडत नसला, तरी प्रत्येकाने आपली तिजोरी आधीच तपासून ठेवलेली केव्हाही चांगली. परदेशात असाल तर व्यवस्थित इन्शुअरन्स असणे जरूरी आहे. तसेच परदेशात हे सर्व खर्च भयानक खर्चिक असतात त्यामुळे ही तयारी महत्वाची आहेच. 
ही सर्व तयारी झाली? Very good ! आता तुम्ही नक्कीच बाळाचा विचार करू शकता.  
बरेचदा कपल्स अज्ञानामुळे, सखोल माहिती नसल्यामुळे किंवा ती करून घ्यायची इच्छा नसल्याने अपत्यनिर्मिती म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्स समजतात. खूपदा त्याकारणामुळे अपत्यनिर्मिती होतही असेल. पण conception( जीवनिर्मिती ) होण्यामागे जे शास्त्र आहे ते माहित करून घेणे गरजेचे आहे. 

स्त्रियांची शारीरिक (Reproductive System) जडणघडण 

स्त्रिया या जन्मत:च आयुष्यभराचा Eggsचा साठा ओव्हरीजमध्ये घेऊन जन्माला येतात. (आपण त्याला Pre-eggs म्हणू.) त्यामुळे स्त्रियांचे बीजांड हे तिच्या वयाइतकेच प्रौढ असते असं म्हणता येईल !
जन्मत:च साधारणपणे १,०००,००० ते २,०००,००० बीजंडे स्त्रीच्या शरीरात असतात. जवळपास  झोपलेल्या स्थितीत. आणि प्युबर्टीच्या हार्मोन्सच्या Wake-up Callची वाट पाहात असतात. 
अर्थात puberty येई पर्यंत साधारण ३००,००० ते ५००,००० च बीजंडे जिवंत राहतात. हे राहीलेले premature-eggs(oocytes) चक्क शरीरात पसरले जातात. व त्या प्रत्येक oocytesमध्ये असतात २३ क्रोमोझोमच्या जोड्या. म्हणजे टोटल क्रोमोझोम्स ४६. परंतू प्रीमॅच्युअर्ड एग्सचे जेव्हा ऍक्चुअल एग मध्ये रुपांतर होते, तेव्हा मात्र या पेशींचे विभाजन होऊन विनाजोडीचे केवळ २३ क्रोमोझोम्स राहतात. [ व उरलेले २३ अर्थातच स्पर्म्समधून मिळून परत २३ क्रोमोझोम्सची जोडी तयार होते.थोडक्यात गर्भ तयार होतो. ]

जेव्हा प्युबर्टीचा काळ येतो, तेव्हा या सर्व प्रीमॅचुअर्ड एग्समधून एकच एग मॅचुअर्ड होते, व ते ओव्हरीजमधून सोडले जाते (हेच ते ओव्ह्युलेशन). या ओव्ह्युलेशनच्या काळात एगचा स्पर्म्सशी संबंध आल्यास conception होते , अथवा न आल्यास मासिक पाळी येते. 

[ या क्रोमोझोम्सवरून आठवले. स्त्रीचे वय जसे वाढू लागते तसेतसे हे पेशी विभागणी तंत्र कदाचित बिघडू शकते. त्यामुळे कधीकधी २३ च्या जागी २४ क्रोमोझोम्स असणे इत्यादी परिस्थिती निर्माण होऊन डाऊन सिंड्रोम असलेली अपत्ये जन्मास येऊ शकतात. त्यामुळे स्त्रीचे वय हे गर्भधारणेत महत्वाचे मानले जाते. 
तसेच स्त्रीचे वय व तिचे रूप हे कधीकधी विषमप्रमाणात असू शकते. म्हणजे ४०ची बाई ३०ची दिसते इत्यादी. याचप्रमाणे एग्ससुद्धा विषमप्रमाणात फर्टाईल असू शकतात. म्हणजे ३०च्या बाईचे बीजांडं हे कमी फर्टाईल किंवा ४०च्या बाईचे बीजांड हे अधिक फर्टाईल असू शकते. आता आधुनिक विज्ञानामुळे या तपासण्या करून घेता येतात, ज्यावरून शरीरात किती फर्टाईल एग्स शिल्लक आहे हे कळते.  ]

क्रमश:

7 comments:

 1. I have been absent for a while, but now I remember why
  I used to love this web site. Thank you, Iཿll try and check back more often.
  How frequently you update your web site?

  Here is my web-site :: play online blackjack

  ReplyDelete
 2. ज्या वेळेस आम्ही सेक्स करतो त्या वेळेस माणसाची जी क्रीम असते ती माझ्या योनी तून लगेच बाहेर पडते आणि अस झाल तर गर्बधारण लवकर होत नाही अस मी ऐकले आहे काय हे खर आहे का मग मला काय कराव लागेल या साठी मला मदत करा

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. If I have a low sperm count then what I should to do to increase my sperm count

  ReplyDelete
 5. Wht r d symptoms of miscarrage in early days...?? and is dt home pregnancy test kit gives 100% accurate result..?? bcz i hv checked it early morning 1st urine content dt tym test is negative nd after sum tym its showing positive...tell me about dt..

  ReplyDelete
 6. Wht r d symptoms of miscarrage in early days...?? and is dt home pregnancy test kit gives 100% accurate result..?? bcz i hv checked it early morning 1st urine content dt tym test is negative nd after sum tym its showing positive...tell me about dt..

  ReplyDelete