Friday, May 28, 2010

प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर?

आपण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह अथवा निगेटीव्ह कशी येते हे पाहीले.
आता तुम्हाला कळले आहे की टेस्ट पॉझिटीव्ह आहे.. मग तुम्ही काय कराल?? :) अर्थातच आनंदाने नाचाल(मनातच!) घरच्या माणसांना, मोठ्यांना ही गुड न्युज द्याल. व सुरू होईल सल्ल्यांची मालिका! :) सवय करून घ्या त्याची. ते सत्र काही लवकर संपणारे नाही.

मी तरी २-३ दिवस पूर्ण ब्लँक झाले होते. जमिनीवर यायला वेळच लागला तसा. आणि अर्थातच थोडीशी भिती/टेन्शन घेऊनच आले जमिनीवर. का? तर घरून भरपूर सुचना. जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका. ३ महिने अज्जिबात कोणाला सांगायचे नाही. अजिबात जास्त तणाव येईल अशी कामं, विचार करायचे नाहीत. इत्यादी इत्यादी..

ह्म्म.. सल्ले अजिबात चुकीचे नाहीत. पण फक्त जस्ट प्रेग्नंट झालेल्या मनाला व शरिराला ते जरा विचित्रच वाटतात. कारण आपण तर अगदी आनंदाने हवेत असतो. मात्र आपण सोडून सगळे तसे मोजुन मापूनच बोलत असतात. असे का?
तर पहिल्या ३ महिन्यात miscarriages होण्याची शक्यता ही अधिक असते. होणार्‍या मातेच्या चुकीच्या आहार-विहाराने ते होऊ शकते. मात्र तेव्हढंच कारण नाही. या ३ महिन्यात होणार्‍या मिसकॅरेजेसचे कारण गर्भाशयाची कमकुवतता, बीजांडाचे व स्पर्म्सचे पूर्णतः निरोगी नसणे -थोडक्यात गर्भ weak असणे इत्यादी गोष्टींने होऊ शकते. ही गोष्ट तशी कॉमनच म्हणायची. म्हणूनच आपल्याकडे पहिले ३ महिने कोणालाही बातमी सांगत नाहीत. त्यात नजर लागणे वगैरे भाग नसतो, तर शास्त्रीय कारण आहे. व डॉक्टर्स लोकं सुद्धा ३ महिने पूर्णपणे पार पडल्यावरच प्रेग्नन्सी कन्फर्म करतात.

त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये होणार्‍या मातेने स्वतःची काळजी घेणं हे तर ओघाने आलेच. पण त्याचबरोबर या ३ महिन्यांचा इतकाही बाऊ करून दडपण घेण्याची जरूरी अजिबात नाही.
जसं नॉर्मल रेग्युलर आयुष्य, रूटीन असेल ते चालू ठेवावे. काही जड गोष्टी उचलू नयेत. बाकी नेहेमीचे घरकाम, नोकरी असेल तर ती, चालणे इत्यादी व्यायाम अशा गोष्टी करायला काहीच हरकत नाही. खाणे सुद्धा सर्व प्रकारचे चालू ठेवावे. माझ्या तर डॉक्टरने मला सांगितले होते, कुठलीही गोष्ट बॅन केलेली नाहीये. माफक प्रमाणात सर्व गोष्टी चालतात. फक्त पपई खाऊ नये कारण पपई खाल्ल्यास गर्भाशय आकुंचन पावू शकते ज्याने गर्भपात होण्याची शक्यता वाढते. मांसाहार करणार्‍यांनी मीट हे व्यवस्थित शिजवलेले आहे ना हे पाहावे. व काही प्रकारचे मासे / रॉ फिश खाऊ नयेत कारण त्यात मर्क्युरीचे प्रमाण जास्त असते. कॉफी दिवसातून जास्तीत जास्त एक कप घ्यावी. त्यापेक्षा जास्त कॅफेनचे प्रमाण पोटात जाणे गर्भाच्या दृष्टीने वाईट. त्यामुळे कॉफी बरोबरच सॉफ्ट ड्रिंक्स, चहा, कोको, चॉकलेट्स या गोष्टी मर्यादित घ्याव्यात.
इत्यादी काही पथ्य सोडली तर नेहेमीसारखा चौरस आहार - भात्,पोळी, पालेभाजी,फळभाजी, कोशिंबीर - असा आहार ठेवावा. जेवण अर्थातच हे सगळे घ्यावे. पण जर जात नसेल तर २ तासांनी उरलेले जेवून घ्यावे. एकंदरीत अनुभव असा आहे की गर्भारपणात भूक तर लागते खूप, मात्र एका वेळेस भरपूर जेवण झाल्यास पोट गच्च होण्याची, गॅसेस होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर २ तासांनी खावे. दुध २ ते ३ ग्लास पोटात गेलेच पाहीजे. तसेच फळे देखील नेमाने खावीत. (यावर माझा नवरा नक्कीच हसेल! कारण फळे खाण्याच्या बाबतीत माझी फार ओरड. पण तुम्ही तसे करू नका. )

सर्वात महत्वाचे ते म्हणजे या काळात किंवा पूर्ण गर्भारपणातच, मन हे अगदी प्रसन्न राहीले पाहीजे. हं, थोडीफार चिडचिड, हळवेपणा, रडारड, एकटेपणाची भावना हे सगळं सगळं जाणवेल. हार्मोन्सचा दोष ! पण ते नॉर्मल आहे. मी कित्येकदा बळंच रडली आहे ढसाढसा. व ते रडत असताना सुद्धा नवर्‍याला हसत सांगितले आहे की हे मनावर घेऊ नकोस, मला माहीतीय मी उगीच रडतीय. रडावेसे वाटले घ्या रडून. मात्र हे सगळे कन्ट्रोल देखील करता आले पाहीजे. शेवटी आपल्या बाळाच्या तब्येतीसाठी ते महत्वाचे आहे! त्यामुळे मातांनो, खुष रहा, मस्तपैकी खा मात्र सुस्त न होता व्यायामही करा ! Your time has begun!

17 comments:

 1. खूपच छान ब्लॉग आहे हा. अगदी सोप्या शब्दात नेमकी माहिती देत आहेत. तुमची प्रत्येक पोस्ट माहितीपूर्ण व उप्योगी आहे.

  ReplyDelete
 2. Thank you Sadhak for your comment.

  ReplyDelete
 3. ब्लॉग का थांबवला? पुढच्या पोस्ट येवू देत !

  ReplyDelete
 4. pahile 3 mahine tar kale pan bakicha block kudhe aahe

  ReplyDelete
 5. mala aata 3 mahina chalu zala aahe mala ajun mahti havi aahe tumchya kadhun can u complete your next block

  ReplyDelete
 6. Hello Priti & Sadhak,

  Thanks for your replies. Sorry for the delay.
  Will write my next blog post very soon.

  ReplyDelete
 7. Pudhci mahiti Kon sangnar

  ReplyDelete
 8. Malahi chid chid hote pude Kay karaych Kay hot kahich mahit nahi aani sangnar hi konich nahi mazya gharat Plz cantinew

  ReplyDelete
 9. Dear writer, very good info u shared we want more info so keep writing.

  ReplyDelete
 10. Khup chaan mahiti diliye. Maz marriage march 13 la zalay ani pregnancy chi waat baghtoy

  ReplyDelete
 11. मासिक पाली संपली कीती दिवसानी sex केला की गरभ राहतो?

  ReplyDelete
 12. मला माझ्या शेवटच्या मासिक पाली च्या १४ दिवसानंतर पुन्हा मासिक पाली आली. नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होत आहे. काही काळजीच कारण आहे का???, कि नॉर्मल आहे???

  ReplyDelete
 13. खुप छान माहिती. शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 14. Masik pali samplyanantar kiti divsani sex kela ki garabha rahato plz reply me

  ReplyDelete
 15. Khup chan mahiti dili ahe. Vachun bare watle. Dhanyawad

  ReplyDelete
 16. Khup chan mahiti dili ahe. Vachun bare watle. Dhanyawad

  ReplyDelete